Showing posts with label कृ. प्र. खाडिलकर. Show all posts
Showing posts with label कृ. प्र. खाडिलकर. Show all posts

इथेच थारा पराक्रमाला

इथेच थारा पराक्रमाला; म्हणोनि देवा जन्म आला ॥

परोपकारे सुखीच झाला, तनूसि झिजवित जगांत ठेला ।
तो शिकवितो या सेवेला ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत मेनका

ताल-केरवा

चाल-जुदाइ में तेरे

गीत प्रकार – नाट्यसंगीत

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥

नभि जनहितरत भास्कर तापत
विकसत पहा नलिनी ॥

पिडित जन देखता, स्वसुखा त्यागी दया ।
जनभयहरण हेचि सुख, सदया देवराया ।
दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी
गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वराविष्कार- ∙ माणिक वर्मा∙ बालगंधर्व∙ आशा खाडिलकर∙ मधुवंती दांडेकर∙ कीर्ती शिलेदार( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत मानापमान

राग – पहाडी, मांड

ताल-केरवा

चाल-सखेरी मैका पिया बिन

गीत प्रकार – नाट्यसंगीत

लग्‍न होईना, नाथा, तात साहिना

लग्‍न होईना, नाथा, तात साहिना ॥

सुरवर, माना सहोदर या जना;
त्यागचि तारक, कांता, विरहिमनांना ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत विद्याहरण

राग – भैरवी

ताल-त्रिवट

चाल-धन्य जाहला, माझा राम पाहिला

गीत प्रकार – नाट्यसंगीत

मद्य-वपु-घट लत्ताप्रहारें फुटत

मद्य-वपु-घट लत्ताप्रहारें फुटत हे,
रुधिरसम मत्तमद वाहे, न भू भार साहे ॥

मधु-वध-कुपित समर जरि गुरुवर करी घोर,
विगतविजय कच नोहे ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर

स्वर- विश्वनाथ बागुल

नाटक – संगीत विद्याहरण

राग – सोहनी

ताल-त्रिवट

गीत प्रकार – नाट्यसंगीत

लपविला लाल गगन-मणि, परि दिन

लपविला लाल गगन-मणि, परि दिन अशुभ होत नच,
दृष्टि न विफला, मगध-समरपति नव रवि उगवला ॥

योग्यचि वर मम, सुखविल बाला,
शुभ दिन अजि सुता, वरिल बघ शिशुपाला ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – भास्करबुवा बखले

स्वर- कल्याणी देशमूख

नाटक – संगीत स्वयंवर

राग – तिलंग

ताल-त्रिवट

चाल-मोहेलीना नेक नजर यानी

गीत प्रकार – नाट्यसंगीत

मजला घडावी हे देवा तव पदसेवा ।

मजला घडावी हे देवा तव पदसेवा । सहवास द्यावा ॥

सेवेत भाग पावतां, सहजा मिळे समता । छंद असा पुरवावा ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत सावित्री

राग – जंगला

ताल-कवाली

चाल-विनति हमारी

गीत प्रकार – नाट्यसंगीत

मज भय न, असा शिरला वारा ॥

मज भय न, असा शिरला वारा ॥

देवाजीचें काज खरोखर मी करीन,
हा माझा तोरा ॥

असतांना नव संचार मनीं,
कोण पुसे तुमच्या जोरा ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – भास्करबुवा बखले

स्वराविष्कार- ∙ निर्मला गोगटे∙ बालगंधर्व( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत द्रौपदी

राग – भैरवी

ताल-कवाली

चाल-मन मगन भया

गीत प्रकार – नाट्यसंगीत

मद्यमद चोरि तप दाउनि सुख नरा ।

मद्यमद चोरि तप दाउनि सुख नरा ।
चौरकही बलभास; शापयोग्या सुरा ॥

ही वारयोषिता दारुणा सेविता ।
भस्म करिते जनां, व्याधी भयकरा ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर

स्वर- विश्वनाथ बागुल

नाटक – संगीत विद्याहरण

राग – पूरिया धनाश्री

ताल-झपताल

चाल-दत्त गुरु दत्त गुरु

गीत प्रकार – नाट्यसंगीत

रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवित

रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे ॥

त्या जे न साधे गगनी, गमे ते साधेचि तव या वदनी ।
अबलाबल नव हे भासे ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वराविष्कार- ∙ मास्टर दीनानाथ∙ आशा भोसले∙ अर्चना कान्हेरे∙ सुरेश वाडकर∙ प्रभाकर कारेकर∙ शरद जांभेकर( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत मानापमान

राग – तिलककामोद

ताल-दीपचंदी

चाल-माई पीतभवीन

गीत प्रकार – नाट्यसंगीत

शशिसूर्यप्रभा गगनाची, ही दासी

शशिसूर्यप्रभा गगनाची, ही दासी भूमितलावरिची ॥

मुखभानुवरा भालहिमकरा स्पर्शाया न धजे ही काया ॥

हे चरण मला रविचंद्रकला, सेवा योग्य गमे यांची ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत मानापमान

राग – मांड, पहाडी

ताल-धुमाळी

चाल-हट छोड सखी

गीत प्रकार – नाट्यसंगीत

तनुला जाळी, आग भडकली रिपु ठरल

तनुला जाळी, आग भडकली;
रिपु ठरला जगांत पहिला;
सुखांत सुरसम अरि मम लोळी ॥

‘कुरुबल दुर्बल’ बोलत अबला;
कौरव आला, दुसरा ठरला,
खरेंचि मरणचि रचिली होळी ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – भास्करबुवा बखले

स्वर- माधवराव वालावलकर

नाटक – संगीत द्रौपदी

राग – पूर्वी

ताल-त्रिवट

चाल-कंगवा बोले

गीत प्रकार – नाट्यसंगीत

थाट समरिचा दावी नट साचा

थाट समरिचा दावी नट साचा; परि येतां
मग काळ करणिचा, लागतो नाट ॥

स्वयंवरा मम नटवा आला; सोंग सजविलें,
धनुला धरिलें, मत्स्य दिसेना, बाण चढविना;
जय पावेना हा थयथयाट ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – भास्करबुवा बखले

स्वर-

नाटक – संगीत द्रौपदी

राग – हमीर

ताल-त्रिवट

चाल-धीट लंगरवा

गीत प्रकार – नाट्यसंगीत

  

ठरला जणु मत्सर राजा

ठरला जणु मत्सर राजा; वृद्ध तरुण बांधिती पूजा ॥

होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला
सह्य तरिच परि परविभव मनाला, हाचि नियम विलया आजि गेला ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – भास्करबुवा बखले

स्वर- नीलाक्षी जुवेकर

नाटक – संगीत द्रौपदी

राग – बागेश्री

ताल-त्रिवट

चाल-अपराध क्षमा करुनिया

गीत प्रकार – नाट्यसंगीत

वरि गरिबा वीरा जी अबला

वरि गरिबा वीरा जी अबला, सुख संसारीं तें केंवि तिला ॥

राघव तोडित धनु ऋषिवेषें, मग जाई वना सीताबाला ॥

अधन धनंजय मीनवधा करी, वनीं वास मग पांचालीला ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत मानापमान

राग – झिंझोटी

ताल-केरवा

चाल-मेरी गलि आ जाव

गीत प्रकार – नाट्यसंगीत

अजि राधा बाला मीच गोपाला ॥

अजि राधा बाला मीच गोपाला ॥

आले चारायाला धेनूंना, मोहिले कंठ-मधुबले कृष्णाला ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – भास्करबुवा बखले

स्वराविष्कार- ∙ नीलाक्षी जुवेकर∙ बालगंधर्व( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत स्वयंवर

राग – देसकार

ताल-त्रिताल

चाल-अमलारा माता

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत

अजि पुरवा ही हौस प्रियकरा

अजि पुरवा ही हौस प्रियकरा, मातृपदीं तनु मम बसवा ॥

स्त्री जगाला स्त्रीच विधाता, होत नाहीं जरि माता,
विश्व सुखीं विष कालवा ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत मेनका

ताल-त्रिताल

चाल-छिन छिनया

गीत प्रकार – नाट्यसंगीत

अचला विचला, दाविल तव अचुक पद

अचला विचला, दाविल तव अचुक पद मार्गाला ॥

दिसत पंथ बहु, संशय आला; अचल धर्म तव प्रेमाला ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – भास्करबुवा बखले

स्वर- बालगंधर्व

राग – ललत

ताल-त्रिवट

चाल-भावेंदा यारदा जोबन

गीत प्रकार – नाट्यसंगीत

भक्तीभाव हा घ्या सेवा

भक्तीभाव हा घ्या सेवा
रुचिर रूप तपनांत तापवा
गोड गोड मज बोलवा ॥

अमर कलासी मम देह धरी
सत्य सत्य त्या राबवा ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत मेनका

राग – काफी

ताल-त्रिवट

चाल-कोन गाव को छोरा

गीत प्रकार – नाट्यसंगीत

चढला रवि तापा तरूप्रिय झाला ॥

चढला रवि तापा तरूप्रिय झाला ॥

कोप-शाप निज वाणी करो कच ।
तरूहि पिताचि गमो मजला ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर

स्वर- हिराबाई बडोदेकर

नाटक – संगीत विद्याहरण

राग – सारंग

ताल-केरवा

चाल-जमुनातट

गीत प्रकार – नाट्यसंगीत

धनी मी, पति वरिन कशी अधना ।

धनी मी, पति वरिन कशी अधना ।
पति जरि अधन, निधनसम,
मानी भामा विफल इतर सुगुणा ॥

प्रखर पराक्रम वीर भानु भुलवित उषा रक्तवदना ।
तोचि निकट मग जातां जाळी तिजला, ऐशी भीती मना ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वर-

नाटक – संगीत मानापमान

राग – भूप

ताल-त्रिवट

चाल-प्रभु उगडुण गिणत

गीत प्रकार – नाट्यसंगीत