नको देवराया अंत आतां पाहूं
प्राण हा सर्वथा जाऊं पाहे
हरिणीचें पाडस व्याघ्रें धरियेलें
मजलागी जाहलें तैसे देवा
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धांवे हो जननी विठाबाई
मोकलुनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात
गीत – संत कान्होपात्रा
संगीत – आनंदघन
स्वराविष्कार- ∙ पं. हृदयनाथ मंगेशकर∙ संजीव चिम्मलगी( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट – साधी माणसं
गीत प्रकार – चित्रगीत, संतवाणी
टीप – • स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीत- आनंदघन• स्वर- संजीव चिम्मलगी, संगीत- कौशल इनामदार