Showing posts with label संत ज्ञानेश्वर. Show all posts
Showing posts with label संत ज्ञानेश्वर. Show all posts

घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे

घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥

चांदु वो चांदणे । चांपे वो चंदने ।
देवकीनंदनेविण । नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज । सितळ वो निकी ।
पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुह्मी गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावी उत्तरें ।
कोकिळें वर्जावें । तुह्मीं बाईयांनो ॥५॥

दर्पणीं पाहतां । रूप न दिसे वो आपुलें ।
बाप रखुमादेवीवरें । मज ऐसें केलें ॥६॥

गीत – संत ज्ञानेश्वर

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- लता मंगेशकर

राग – बागेश्री

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, संतवाणी

हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी ।

हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासि क्षणमात्रें ॥१॥

तृण अग्‍निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥

हरि उच्‍चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाध भेणें तेथें ॥३॥

ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

गीत – संत ज्ञानेश्वर

संगीत – चंद्रशेखर कामेरकर

स्वर- आशा भोसले

गीत प्रकार – संतवाणी

पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं

पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं ।
नको हा वियोग कष्ट होताती जिवासि ॥१॥

दिनु तैसी रजनी मज जाली गे माये ।
अवस्था लावुनि गेला अझुनीं कां न ये ॥२॥

गरुडवाहना, गंभीरा येईं गा दातारा ।
बाप रखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥

गीत – संत ज्ञानेश्वर

संगीत – किशोरी आमोणकर

स्वराविष्कार- ∙ किशोरी आमोणकर∙ आशा भोसले( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

गीत प्रकार – विठ्ठल विठ्ठल, संतवाणी

  टीप – • स्वर- किशोरी आमोणकर, संगीत- किशोरी आमोणकर.• स्वर- आशा भोसले, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर.

ॐ नमोजी आद्या ।

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥

देवा तूंचि गणेशू । सकळमतिप्रकाशु ॥
ह्मणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥

अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥

हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥

आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी ॥
ते श्रीशारदाविश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥

गीत – संत ज्ञानेश्वर

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- लता मंगेशकर

गीत प्रकार – संतवाणी

  टीप – • ‘ॐ’कारातील सहस्वर- उषा मंगेशकर, मीना खडीकर, हृदयनाथ मंगेशकर.

एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।

एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसि करूणा येईल तूझी ॥१॥

तें नाम सोपारें राम कृष्ण गोविंद ।
वाचेसीं सद्गद जपें आधीं ॥२॥

नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा,
वायां आणिका पंथा जासी झणें ॥३॥

ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं,
धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥

गीत – संत ज्ञानेश्वर

संगीत – केशवराव भोळे

स्वराविष्कार- ∙ यशवंत∙ प्रकाश घांग्रेकर∙ प्रसाद सावकार( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

चित्रपट – संत ज्ञानेश्वर

गीत प्रकार – चित्रगीत, संतवाणी

  टीप – • स्वर- यशवंत, संगीत- केशवराव भोळे, चित्रपट- संत ज्ञानेश्वर.• स्वर- प्रकाश घांग्रेकर, संगीत- ???.• स्वर- प्रसाद सावकार, संगीत- ???.