Showing posts with label इंदिरा कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label इंदिरा कुलकर्णी. Show all posts

सखि बघ अघटित घडले ग स्वप्‍नामध

सखि बघ अघटित घडले ग
स्वप्‍नामधल्या निशिगंधाची अवचित हो‍ऊन गेले ग !

मजला काही न कळले ग
संथ शांत या सरितेचे जळ आज खळाळून उठले ग !

गगन धरेवर झुकले ग
सुधबुध सारी राधेपरि मी पुरती हरवुनी गेले ग !

वादळ वारे सुटले ग
श्रावणमेघापरी बरसला, सचैल पुरती न्हाले ग !

तेज रवीचे झरले ग
पान पान या प्राणलतेचे लाजलाजुनी लवले ग !

गीत – इंदिरा कुलकर्णी

संगीत – गजानन वाटवे

स्वराविष्कार- ∙ रंजना जोगळेकर∙ कुंदा बोकिल( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

गीत प्रकार – भावगीत