जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा ।
गमे या भ्रांत संसारीं । ध्रुवाचा ‘वेड’ हा तारा ॥
कुणाला वेड कनकाचें । कुणाला कामिनी जाचे ।
भ्रमानें राजसत्तेच्या । कुणाचें चित्त तें नाचे ॥
कुणाला देव बहकावी । कुणाला देश चळ लावी ।
कुणाची नजर धर्माच्या । निशेनें धुंदली भारी ॥
अशा या विविध रंगाच्या । पिशांच्या लहरबहरींनीं ।
दुरंगी दीन दुनियेची । जवानी रंगली सारी ॥
गीत – वीर वामनराव जोशी
संगीत – वझेबुवा
स्वराविष्कार- ∙ मास्टर दीनानाथ∙ आशा भोसले( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक – संगीत रणदुंदुभि
चाल-कियामत सर पे आई है
गीत प्रकार – नाट्यसंगीत
टीप – • गझल