Showing posts with label यशवंत देव. Show all posts
Showing posts with label यशवंत देव. Show all posts

पतंगा जशी ओढ ज्योतीकडे तशी प्र

पतंगा जशी ओढ ज्योतीकडे
तशी प्रीत माझी तुझ्याशी जडे

जशी धाव घेते नदी सिंधुपाशी
तसे वेड तुझे मनाला जडे

इथे कंटकांनी मला वेढिली
तुला गंधवार्ताही ना लाभली
न साही जीवा भार या सौरभाचा
कधी भृंग धावेल माझ्याकडे?

सदा भास वेडावतो गे तुझा
अशी का दुरुनीच देशी सजा
इथे कंकणांचा, इथे पल्लवांचा
करी सुन्‍न कल्लोळ चोहीकडे

गीत – यशवंत देव

संगीत – यशवंत देव

स्वर- दशरथ पुजारी, प्रमिला दातार

गीत प्रकार – युगुलगीत, भावगीत

शब्दमाळा पुरेशा न होती

शब्दमाळा पुरेशा न होती, स्पर्श सारेच सांगून जातो
लोचनाआड जातेस तेव्हा पापणीला तुझा रंग येतो

आर्त कोमेजलेल्या मनाची पाकळी पाकळी खिन्‍न झाली
सांत्वनाच्या तुझ्या फुंकरीने प्राण लेवून आली नव्हाळी
एक हुंकार देतो दिलासा, एक झंकार गात्रात गातो

माळ वैराण नि:श्वासताना रानपक्षी कसा गात होता
काळरात्रीसही सोबतीला रातराणी तुझा गंध होता
काल नि:श्वासलेला तराणा आज विश्वास देऊन जातो

मोरपंखी खुणेसारखी तू, चित्त मोहून घेतो फुलोर
अभ्र दाटून आले तरीही तू ढगामागची चंद्रकोर
चांदण्याचा झुला हालताना जीव भोळा शहारून जातो

गीत – यशवंत देव

संगीत – यशवंत देव

स्वराविष्कार- ∙ अरुण दाते∙ येसुदास( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

गीत प्रकार – भावगीत, नयनांच्या कोंदणी

  टीप – • मुंबई आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- येसुदास.

श्रीरामाचे चरण धरावे दर्शनमात्

श्रीरामाचे चरण धरावे
दर्शनमात्रे पावन व्हावे

सती अहिल्या दगडामाजी
शापित होऊन युगयुग मोजी
परि प्रभुच्या पदस्पर्शाने पाषाणासही जीवन द्यावे

उष्टी बोरे अर्पुन प्रभुला
शबरीने जणू ठाव पाहिला
स्वीकारुन ती रघुरायाने देवपणाचे बीरुद ल्यावे

वनवासातच जीवन सरले
रामायणही तिथेच घडले
अयोध्येस प्रभु परतुनि येता प्रेमाश्रूंनी नगर भिजावे

गीत – यशवंत देव

संगीत – यशवंत देव

स्वर- सुमन कल्याणपूर

राग – पूरिया धनाश्री

गीत प्रकार – राम निरंजन, भावगीत

टाकिलेस नाव जरी आठवीन मी तुला

टाकिलेस नाव जरी आठवीन मी तुला
जाळिलेस पंख तरी झेप घ्यायची मला

तो प्रशांत सांध्यमेळ
प्रीतिचा सुरम्य खेळ
जपिन तोच क्षण सुवर्ण
मधुर संगतीतला

प्रीतिकथा घडलेली
जाणतात वनवेली
शोक-अंत वाचुनिया
आसमंत स्फुंदला

चुकवशील जागेपणि
म्हणशिल जा जा इथुनी
स्वप्‍नभेट परि कशी
चुकेल रे तुला मला

गीत – यशवंत देव

संगीत – यशवंत देव

स्वर- सुमन कल्याणपूर

गीत प्रकार – भावगीत

यश अंती लाभणार, सत्य हे

यश अंती लाभणार, सत्य हे
यावर अमुचा दृढ विश्वास
यश अंती लाभणार, सत्य हे !

येईल भूवरी शांती
यावर अमुचा दृढ विश्वास
येईल भूवरी शांती, सत्य हे !

चालू प्रगतीचीच वाट
घालून हातात हात
चालू प्रगतीचीच वाट, सत्य हे !

भीती नसे आता
ना भय मुळी आता
भीती नसे आता, सत्य हे !

गीत – यशवंत देव

संगीत – यशवंत देव

स्वर- आकाशवाणी गायकवृंद

गीत प्रकार – स्फूर्ती गीत

भारतमाता परमवंद्य धरा

भारतमाता परमवंद्य धरा
मायभू आमुची, कोटी बांधव हे आम्ही

आणुनिया पावन सुरसरिता श्रमगंगा
म्लानमुखी स्मित कमळे फुलवू

विविध जरी भाषा, भिन्‍न धर्मदिशा
प्रगति पंथ तरी एक असे
येउ दे अंधार वा वादळी असु दे हवा
चाललो ध्येयाकडे

मातेसाठी सर्वस्वाचे बलिदान करू

सळसळत्‍या सोनेरी शेतातुनी
कसणार्‍या बाहूंची संजीवनी
आमुच्या कामातुनी घामातुनी रक्तातुनी
निपजो सुजल धरा सुफल धरा
उसळुन ये कष्टांची आराधना
धगधगत्या लोहाच्या ज्वालेतुनी

निज शक्तीविण आम्‍हा आधार दुजा नाही
अमुच्याच प्रयत्‍नांची आम्‍हास खरी ग्‍वाही

गीत – यशवंत देव

संगीत – कनू घोष

स्वर- आकाशवाणी गायकवृंद

गीत प्रकार – स्फूर्ती गीत