शशिसूर्यप्रभा गगनाची, ही दासी

शशिसूर्यप्रभा गगनाची, ही दासी भूमितलावरिची ॥

मुखभानुवरा भालहिमकरा स्पर्शाया न धजे ही काया ॥

हे चरण मला रविचंद्रकला, सेवा योग्य गमे यांची ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत मानापमान

राग – मांड, पहाडी

ताल-धुमाळी

चाल-हट छोड सखी

गीत प्रकार – नाट्यसंगीत