Showing posts with label मधुसूदन कालेलकर. Show all posts
Showing posts with label मधुसूदन कालेलकर. Show all posts

अ आ आई, म म मका

 अ आ आई, म म मका

मी तुझा मामा, दे मला मुका


प प पतंग आभाळात उडे

ढ ढ ढगांत चांदोमामा दडे

घ घ घड्याळ, थ थ थवा

बाळ जरि खट्याळ, तरी मला हवा


ह ह हम्मा गोड दूध देते

च च चिऊ अंगणात येते

भ भ भटजी, स स ससा

मांडीवर बसा नि खुदकन हसा


क क कमळ पाण्यावर डुले

ब ब बदक तुरुतुरु चाले

ग ग गाडी झुक झुक जाई

बाळ माझे कसे गोड गाणे गाई


गीत  -  मधुसूदन कालेलकर

संगीत  -  राम कदम  

स्वर- मन्‍ना डे

चित्रपट  -  एक धागा सुखाचा  

गीत प्रकार  -  बालगीत, चित्रगीत



जगाला नाही रे मंजूर राया आपुली

जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती !
राहिले लोचनी आसू, उरे ती याद ही ओठी !

कुणाला दु:ख सांगू मी?
कुणाला वेदना आता?
असे ते देत दुनिया ही, कुणी नाही मला त्राता !

कुणाला बोल लावावा?
कुणाशी न्याय मागावा?
कुणाचा दोष अन्‌ शिक्षा कुणाला? काय हे देवा !

गीत – मधुसूदन कालेलकर

संगीत – शंकरराव कुलकर्णी

स्वर- लता मंगेशकर, सुधीर फडके

चित्रपट – अखेर जमलं

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत

ठाऊक नाही मज काही ! ठाऊक आहे क

ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई?

मऊ जशी ती साय दुधाची
होती आई का तशी मायेची?
बागेतील ते कमल मनोहर
आई होती का तशीच सुंदर?
देवाघरी का एकटी जाई?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई?

चिउकाऊची कथा चिमुकली
सांगत होती का ती सगळी?
अम्हांसारखे शुभंकरोती
म्हणे रोज का देवापुढती?
गात असे का ती अंगाई?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई?

मऊ सायीहून आई प्रेमळ !
गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घास भरविते
आभाळापरि माया करिते
आईवाचुन मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई?

गीत – मधुसूदन कालेलकर

संगीत – राम कदम

स्वर- स्‍नेहल भाटकर, वसुमती दोंदे

चित्रपट – एक धागा सुखाचा

गीत प्रकार – बालगीत, आई, चित्रगीत

अ आ आई, म म मका मी तुझा मामा,

अ आ आई, म म मका
मी तुझा मामा, दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरी मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडीवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

गीत – मधुसूदन कालेलकर
संगीत – राम कदम
स्वर- मन्‍ना डे
चित्रपट – एक धागा सुखाचा
गीत प्रकार – बालगीत, चित्रगीत

डोळे माझे त्यात तुझे रूप कसे?

डोळे माझे त्यात तुझे रूप कसे?
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे?

चित्त माझे त्यात तुझी प्रीत कशी?
वीज इथे आग तिथे सांग कशी?
नीज माझी त्यात तुझे स्वप्‍न कसे?

चाल माझी त्यात तुझा डौल कसा?
स्पर्श तिथे कंप इथे सांग कसा?
गाल माझे त्यात तुझे रंग कसे?

चंद्र माझा त्यात तुझा डाग कसा?
देह इथे प्राण तिथे सांग कसा?
चाल माझी त्यात तुझे सूर कसे?

श्वास माझा त्यात तुझी ओढ कशी?
चोर तिथे चोरी इथे सांग कशी?
वेध माझा त्यात तुझे तीर कसे?

गीत – मधुसूदन कालेलकर

संगीत – सुधीर फडके

स्वर- सुधीर फडके, सुमन कल्याणपूर

चित्रपट – लग्‍नाला जातों मी

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत, नयनांच्या कोंदणी

एकदा येऊन जा तू, एकदा भेटून जा

एकदा येऊन जा तू, एकदा भेटून जा
मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगून जा

मीलनाचे चित्र होते अंतरी मी रेखिले
मी तुझ्यामाझ्यात होते विश्व सारे देखिले
आज सीमा त्या जगाची तूच ओलांडून जा

शेवटी संपून गेली स्वप्‍नसुंदर ती कथा
मी तरी कुरवाळतो, जपतो उरी वेडी व्यथा
आठवावे मीच ते, विसरू कसा सांगून जा

गीत – मधुसूदन कालेलकर

संगीत – गजानन शिर्के, द्वारकानाथ भोसले

स्वर- मुकेश

चित्रपट – सप्‍तपदी

गीत प्रकार – चित्रगीत