झाकली मूठ सव्वा लाखाची
उघडली तरी मोलाची
त्यात दडलेले असतात काही गुलाबी क्षण
त्याची झलक म्हणजे,
वस्त्रहरण !
खट्याळ हळवी धमाल मिश्किल
कहाणी किस्से जुळून येतील
टपली टिचकी जराशी फिरकी
थोडसं टेन्शन
वस्त्रहरण !
गीत – चंद्रशेखर सानेकर
संगीत – अवधूत गुप्ते
स्वर- अवधूत गुप्ते
गीत प्रकार – मालिका गीते
टीप – • शीर्षक गीत, मालिका- वस्त्रहरण, वाहिनी- झी मराठी.