झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता
मी पंख जमविले तेव्हा, तिने देह ठेविला होता
गणगोत भोवती जमले, सूर्यास्तही झाला होता
माझेही थकले डोळे दु:खाने रडता रडता
कल्लोळ मनाचा झाला, संपलीत सगळी नाती
ही माय माउली माझी, मरणाने गिळली होती
गीत – बाबासाहेब सौदागर
संगीत – अशोक पत्की
स्वर- देवकी पंडित
चित्रपट – मी सिंधुताई सपकाळ
गीत प्रकार – चित्रगीत, आई