मी पहावे तू दिसावे
पारणे या मनाचे फिटेना
अंतरीची अंतरे ही
का तरीही सारी मिटेना?
हीच प्रीती, हीच भीती
वीण दोघांतली ही तुटेना
हेच कोडे रोज थोडे
सोडवावे तरीही सुटेना
आस मुकल्या जीवनाची
आज खुलता कळी ही खुलेना !
वाट चुकल्या या मनाची
आज खुलता कळी ही खुलेना !
गीत – समीर सप्तीस्कर
संगीत – समीर सप्तीस्कर
स्वर- श्रेया घोषाल
गीत प्रकार – मालिका गीते
टीप – • शीर्षक गीत, मालिका- खुलता कळी ही खुलेना, वाहिनी- झी मराठी.