Showing posts with label रा. ना. पवार. Show all posts
Showing posts with label रा. ना. पवार. Show all posts

क्षणभर, उघड नयन देवा

क्षणभर, उघड नयन देवा

करावया तव मंगल पूजा
देहदीप मी जाळिन माझा
भावभक्तिचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा

धूप जाळिते मी श्वासाचा
सुगंध पसरिल मंगलतेचा
कोमल पद हृदयावर ठेवित प्रभु माझा यावा

अभंग नाही, नाही ओवी
मूक जिवाने कशि रे गावी?
नयनांमधले अश्रू करिती अखेरचा धावा

गीत – रा. ना. पवार

संगीत – दशरथ पुजारी

स्वर- माणिक वर्मा

राग – पूर्वा कल्याण

गीत प्रकार – प्रार्थना, नयनांच्या कोंदणी