Showing posts with label गजेंद्र अहिरे. Show all posts
Showing posts with label गजेंद्र अहिरे. Show all posts

दळ उमलत जाते एकेक

दळ उमलत जाते एकेक
वर दंवबिंदूंची थरथर
मन धुक्यात हरवत जाते
अंधारपरतीच्या वाटेवर
लख्ख उजळून आले श्वास
झाले मोकळे आकाश !

नाते सावरताना माझ्या अश्रूंचा प्रकाश
म्हणेल ओली माती, झाले मोकळे आकाश !

गीत – गजेंद्र अहिरे

संगीत – अभिराम मोडक

स्वर- बेला शेंडे, सावनी शेंडे

गीत प्रकार – मालिका गीते

  टीप – • शीर्षक गीत, मालिका- झाले मोकळे आकाश, वाहिनी- झी मराठी.

ओंजळीत माझ्या माझे उसासे

ओंजळीत माझ्या माझे उसासे
आणि भोवताली आभाळ भासे !

कंठात हुंकार परतून गेले
तळव्यात अश्रू किती वेचलेले
कसे मीच माझे अवसान होते
स्वप्‍नास माझ्या, माझे दिलासे
आणि भोवताली आभाळ भासे !

दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा
जगणेच आहे इथे साचलेले
किती प्रश्‍न भवती आणि मन रिकामे
कशाचे करावे स्वत:शी खुलासे
आणि भोवताली आभाळ भासे !

गीत – गजेंद्र अहिरे

संगीत – भास्कर चंदावरकर

स्वर- साधना सरगम

चित्रपट – सरीवर सरी

गीत प्रकार – चित्रगीत