Showing posts with label ग. ह. पाटील. Show all posts
Showing posts with label ग. ह. पाटील. Show all posts

फुलपांखरूं । छान किती दिसते ।

फुलपांखरूं ।
छान किती दिसते । फुलपांखरूं

या वेलींवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

डोळे बारिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येइ न हाता
दूरच तें उडतें । फुलपांखरूं

गीत – ग. ह. पाटील

संगीत – चिनार-महेश

स्वर- स्वप्‍नील बांदोडकर

चित्रपट – टाईमपास

गीत प्रकार – चित्रगीत