Showing posts with label नाना पालकर. Show all posts
Showing posts with label नाना पालकर. Show all posts

यशाने दुमदुमवू त्रिभुवने सकल

यशाने दुमदुमवू त्रिभुवने

सकल भेद भारती मिटावे
अभिमाने हे राष्ट्र उठावे
आकांक्षांनी अशा आमुची संचरलेली मने

कर्तुत्वाच्या विश्वासावर
सदैव आम्ही राहू निर्भर
नैराश्याचे ऐकु न येईल यापुढती तुणतुणे

मन का दुबळे अदास व्हाया?
लोह असे का मन गंजाया?
का भीषण त्या मुशीत सोने ठरते हिणकस उणे?

वाळूवरती मीन तडफडे
तसेच अमुचे जीवन उघडे
ध्येयसागरी विहरू अथवा क्षणी संपवू जिणे

संकल्पाच्या सिद्धीवाचुन
थांबू आम्ही एकहि न क्षण
नेत्याच्या त्या आधीन केवळ अमुची ही जीवने

धीर-वृत्तिचा उंच हिमाचल
भीषणतेतहि निर्भय निश्चल
नेता ऐसा मिळे अम्हांला, काय असे मग उणे

गीत – नाना पालकर

संगीत –

स्वर-

गीत प्रकार – स्फूर्ती गीत

  

चला निघू या सरसावोनी देशाच्या

चला निघू या सरसावोनी देशाच्या उद्धरणी !

विस्कटलेले अवघे जीवन खंत जयांना याची
पडती स्वप्‍ने उत्थानाची उज्ज्वल भवितव्याची
जागरूक अभिमानी असले असती जे जे कोणी !

उधाणलेल्या जलधीसंगे यावा झंझावात
तशी देउनी पराक्रमाला अभिमानाची साथ
परक्यांची या टाकू पुसुनी येथिल नावनिशाणी !

त्रिखंडात दुमदुमुनी जावी जरि राष्ट्राची कीर्ती
कार्यमग्‍नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती
भेद विरावे स्फुरण चढावे नवशुभ आकांक्षांनी !

ईर्ष्या अमुची कधी नसावी क्षणिक पुराचे पाणी
‘कसे व्हायचे’ अशी नसावी खचलेली जनवाणी
हासत जावे काट्यांवरुनी तरुणांनी अनवाणी !

उठता आपण नमतिल विघ्‍ने महाभयंकर आता
काय न केला आपण मर्दन तुंग हिमालय माथा?
विलंब का मग आणू वैभव लीलेने जिंकोनी !!

गीत