Showing posts with label वसंत शांताराम देसाई. Show all posts
Showing posts with label वसंत शांताराम देसाई. Show all posts

कटु योजना ही । विधिची ।

कटु योजना ही । विधिची ।
अजि साहुं कैसा? । मज बल ना ! ॥

रतिसम कांता । जरि संसारीं ।
परि सुख नाहीं । हीच दुष्ट घटना ॥

गीत – वसंत शांताराम देसाई

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- प्रकाश घांग्रेकर

नाटक – संगीत अमृतसिद्धी

राग – शंकरा

ताल-त्रिताल

चाल-जिया में बसेरा

गीत प्रकार – नाट्यसंगीत

पतितपावना । भेट नच पुन्हा । जी

पतितपावना । भेट नच पुन्हा ।
जीव आज सुना । माना ॥

निज कन्यका मज मानिलें ।
उतराई कैसे व्हावे । शतजन्‍म अपुरे माना ॥

गीत – वसंत शांताराम देसाई

संगीत – मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन

स्वर- मास्टर कृष्णराव

नाटक – संगीत विधिलिखित

राग – कर्नाटकी तोडी

ताल-त्रिताल

चाल-पतितपावना

गीत प्रकार – नाट्यसंगीत

पतिदेवता गुरुदेवता

पतिदेवता गुरुदेवता । जणुं देत माते आशीर्वचा ॥

तनया सदा यश सौख्य लाभो । धरि वासना ही राजमाता ॥

गीत – वसंत शांताराम देसाई

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- पं. राम मराठे

नाटक – संगीत अमृतसिद्धी

राग – करहरप्रिया

ताल-त्रिताल

चाल-पीताम्बरा

गीत प्रकार – नाट्यसंगीत

रमवि नयनां । ही प्रभुलीला अमर

रमवि नयनां । ही प्रभुलीला
अमर कृतिला । त्या तुलना ना ॥

जादुगार चतुर भासला
रमवी, भुलवी, सहज ते भुवना ॥

गीत – वसंत शांताराम देसाई

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- रतिलाल भावसार

नाटक – संगीत प्रेमसंन्यास

राग – बिहाग

ताल-केरवा

चाल-तानोम तानोम्‌

गीत प्रकार – नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी

ताराया दीन अबला या । हरित प्रब

ताराया दीन अबला या ।
हरित प्रबल पापभार दशावतार वरिले ।
तेहि काय वाया? ॥

सुबल वरि अबलताच माना ।
प्राप्त अभय तिज नित्य भूतली ।
असुरदमन छळिता तिला स्वपद नाश वरिला ।
सार्थ सार्थ माया ॥

गीत – वसंत शांताराम देसाई

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- मास्टर कृष्णराव

नाटक – संगीत विधिलिखित

राग – गरुडध्वनी

ताल-त्रिवट

चाल-शरण पदा

गीत प्रकार – नाट्यसंगीत

धन्य तूंचि कांता । गमसी करितां

धन्य तूंचि कांता । गमसी करितां क्षमा कांता ॥

नवजन्म घेता । त्वदीय सहवास लाभो । दुजी नच वांच्छा ॥

गीत – वसंत शांताराम देसाई

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- गंगाधर लोंढे

नाटक – संगीत अमृतसिद्धी

राग – नंद

ताल-झपताल

चाल-धुंडाबान

गीत प्रकार – नाट्यसंगीत

धवल लौकिका । मलिन करित मम जनता

धवल लौकिका । मलिन करित मम जनता ॥

विमला मम कांता । जी जगता दे शुचिता ॥
पतियश नाशिल ती का? ॥

गीत – वसंत शांताराम देसाई

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वराविष्कार- ∙ प्रभाकर कारेकर∙ प्रभुदेव सरदार( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत अमृतसिद्धी

राग – बागेश्री

ताल-एकताल

चाल-कमल कोमला

गीत प्रकार – नाट्यसंगीत

गमते सदा मजला

गमते सदा मजला । द्वारका वंद्य ।
प्रभुच्या पदांबुजें जगीं । जी होत धन्य ॥

भासत ती मूर्ती बघतां । हा त्यजोनी ।
स्वर्गीचे जणू सिंहासन । प्रभुराज । अवतरला ॥

गीत – वसंत शांताराम देसाई

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर-

नाटक – संगीत अमृतसिद्धी

राग – भीमपलास

ताल-त्रिताल

चाल-कवन बताये

गीत प्रकार – नाट्यसंगीत