Showing posts with label स. अ. शुक्ल. Show all posts
Showing posts with label स. अ. शुक्ल. Show all posts

लुटुलुटु धावत खुदुखुदु हासत

लुटुलुटु धावत खुदुखुदु हासत
हरी आला ग माझ्या अंगणी

रुणझुणतो वाळा करी लाडिकचाळा
नाचे कान्हा ग माझ्या अंगणी

जाई-जुई फुलली
जिवाची कळी कळी फुलली
बघ चिमण्या अधरी
कशी ग बाई धरी चिमणी मुरली
ल्याला गोजिरवाणी, नवलाईची लेणी
नंदकिशोर आला अंगणी

बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी, ब्रह्म सानुले उभे अंगणी

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – यशवंत देव

स्वर- सुमन कल्याणपूर

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, भावगीत

हले, झुलत डुले पाळणा

हले, झुलत डुले पाळणा
प्राणफुला झोपी जा ना
जो जो रे

निजला गंध वारा, झोपला नभी तारा
पेंगुळला पानांवरी कळ्या-फुलांचा तुरा

पुनवा रात बोले, मीट तू बाळा डोळे
झोका देते रे, नीज लाडक्या चिमण्या छकुल्या राजिवा

पाळणा मंद होतो, आईला आलिंगतो
काळजाचे पांघरूण घालिते आई तुला

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – स्‍नेहल भाटकर

स्वर- लता मंगेशकर

चित्रपट – चिमुकला पाहुणा

गीत प्रकार – चित्रगीत

हरि वाजवि मंजुळ मुरली

हरि वाजवि मंजुळ मुरली
बाई ! मुरलिने तहान-भूक हरली

कामकाज हातचे टाकुनी
गोकुळ अवघे नाचत हरखुनि
मुरलीच कानि मनि भरली

तान्हुल्यासि पाजिते कुणि गवळण
मुरलीने बावरली ती पण
तिला मुलाचि शुद्धच नुरली

राधा तर बघ वेडी झाली
सोडुनि पतिची शेज चालली
जना-मनाची लज्जा सरली

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- अमिरबाई कर्नाटकी

गीत प्रकार – भावगीत, हे श्यामसुंदर

रमला कुठे ग कान्हा का अजुनी ये

रमला कुठे ग कान्हा
का अजुनी येई ना?

बाई तिन्हीसांजा झाल्या
गाई घरा परतल्या
धुंडोनी नजरा शिणल्या
कुठे शोधू माझा तान्हा?

मुरलीचा मंजुळ सूर
घुमतो का कोठे दूर
लागे जीवा हुरहूर
आवरेना फुटला पान्हा

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – जी. एन्‌. जोशी

स्वर- लीला लिमये

गीत प्रकार – भावगीत, हे श्यामसुंदर

त्राता प्रभु सकलांचा

त्राता प्रभु सकलांचा । हा अंतरिचा साचा ।
दृढ भाव निरंतरचा ॥

नच जिवास आसरा । प्रभुवाचुनि दुसरा ।
घेतचि स्वजनांचा तो भार शिरीं सारा ॥

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – सवाई गंधर्व, हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने

स्वर- हिराबाई बडोदेकर

नाटक – संगीत साध्वी मीराबाई

राग – बागेश्री

ताल-धुमाळी

गीत प्रकार – नाट्यसंगीत, भक्तीगीत

चल रानात सजणा

चल रानात सजणा
आंबेवनात जाऊ या दूर

राया, गुपीत अपुलं फुटलं
जग भोंतीचं बोलत सुटलं
उठे काहूर, लागे हुरहूर
आंबेवनात जाऊ या दूर

चांदण्याची पांघरुन शाल
लुटू आनंद धुंद खुशाल
बघु नवतीचा दुनियेचा नूर
आंबेवनात जाऊ या दूर

नको संकोच भीती मनात
सख्या, जीवाची करू चांदरात
दाटे प्रीतीचा रंगरस-पूर
आंबेवनात जाऊ या दूर

जीवाजिवाची मंजुळ गाणी
जीवाजिवाची प्रेमळ गाणी
बसू गात पांखरावाणी
फिरु गात पांखरावाणी
धरु प्रीतीचा एक ताल-सूर
आंबेवनात जाऊ या दूर

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – जी. एन्‌. जोशी

स्वर- जी. एन्‌. जोशी

गीत प्रकार – भावगीत

चकाके कोर चंद्राची

चकाके कोर चंद्राची, मनाला मोहिनी घाली
लकाके चंचला बाला, उषा की हासरी आली
कुणा हा भाग्यवंताचा असावा प्रीतिचा ठेवा
कुठे मी काजवा वेडा, कुठे ही तारका बाळी

उदेला चंद्र हा पाही, जिवाला हासवी मोही
करी जादूगिरी कान्हा, भुलवितो हा कसा बाई
कुणा हा भाग्यवंतीचा असावा प्रीतीचा ठेवा
कुठे हा लाल मोलाचा, करंटी गोरटी ही

मिळवणी दोन जिवांची वसे तेथेच वेल्हाळी
बघे ना भेदभावाला जगी प्रीति खुळी भोळी

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – जी. एन्‌. जोशी

स्वर- गंगुबाई हनगल, जी. एन्‌. जोशी

गीत प्रकार – शब्दशारदेचे चांदणे, युगुलगीत, भावगीत

डौल तुझा मोहक प्यारा

डौल तुझा मोहक प्यारा
नाजुक साजुक न्यारा

तुझ्या दिलाचा हा बघ पिंजरा
देई सुखाचा आसरा

प्रीतीच्या गुणी पांखरा
रमवि जीवा जरा

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – ए. पी. नारायणगांवकर

स्वर- सुरेश हळदणकर

गीत प्रकार – भावगीत

एकटीच भटकत नदीकाठी

एकटीच भटकत नदीकाठी
ऐन दुपारी तोर्‍यानं
नटुनथटुन जशी चटकचांदणी
कुठं चाललीस नखर्‍यानं

अंगांत धमक डोळ्यांत चमक
कमरेत लचक आणि नजरेत वचक
काळजास का देसी चरका
मारुनी मुरका कुर्र्यानं
जशी कुणा घायाळ कराया
नेत्रशरांच्या मार्‍यानं

गाल रंगदार चाल ढंगदार
धुंद नागिणी जशी चमकशी
नवरसरंग-फवार्‍यानं
चाल हळू जरा- सावर, आवर
पदर उडाला वार्‍यानं

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – जी. एन्‌. जोशी

स्वर- जी. एन्‌. जोशी

गीत प्रकार – भावगीत