खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥

नभि जनहितरत भास्कर तापत
विकसत पहा नलिनी ॥

पिडित जन देखता, स्वसुखा त्यागी दया ।
जनभयहरण हेचि सुख, सदया देवराया ।
दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी
गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वराविष्कार- ∙ माणिक वर्मा∙ बालगंधर्व∙ आशा खाडिलकर∙ मधुवंती दांडेकर∙ कीर्ती शिलेदार( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत मानापमान

राग – पहाडी, मांड

ताल-केरवा

चाल-सखेरी मैका पिया बिन

गीत प्रकार – नाट्यसंगीत