Showing posts with label ना. सी. फडके. Show all posts
Showing posts with label ना. सी. फडके. Show all posts

ललना दिसे सुप्रभाती ।

ललना दिसे सुप्रभाती । नयना तुझ्या दर्शनांती ।
अलकांचिया पाशा धरिता । मृदू त्या हातीं ॥

हसतमुखी सन्मुख राही । लाजुनी वाट पाही ॥

गीत – ना. सी. फडके

संगीत – केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने, सवाई गंधर्व

स्वर- सुरेशबाबू माने

नाटक – युगान्‍तर

राग – काफी

ताल-एकताल

गीत प्रकार – नाट्यसंगीत

पदपंकजातें प्रभुच्या वरोनीं ।

पदपंकजातें प्रभुच्या वरोनीं । मिळतो विसावा भयशंकितातें ॥

नृपती नृपांचा परमेश साचा । झणिं देई अभया शरणांगतातें ॥

गीत – ना. सी. फडके

संगीत – हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने, केशवराव भोळे, सवाई गंधर्व

स्वर- हिराबाई बडोदेकर

नाटक – युगान्‍तर

गीत प्रकार – नाट्यसंगीत