अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार
प्रकाश सगळा सोडून आला शांत शांत अंधार
उजेडातल्या रखरखलेल्या, हटवादी अन् दुर्मुखलेल्या
अगणित चेहर्यांच्या गर्दीला कवेत घेई अंधार
काळोखातून झुळूक येते, हळूच डोळे पुसून जाते
स्तब्धस्तब्ध अन् हळवाहळवा
कधी निवांत, कधी आसुसला मंद मंद अंधार
गीत – सुनिल सुकथनकर
संगीत – श्रीरंग उमराणी
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
चित्रपट – नितळ
गीत प्रकार – चित्रगीत