शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी ।
सुखसाधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
गीत – स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत – वझेबुवा
स्वराविष्कार- ∙ मास्टर दीनानाथ∙ पं. वसंतराव देशपांडे∙ प्रभाकर कारेकर( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक – सन्यस्त खड्ग
राग – भैरवी
चाल-आखोंने तेरे गममें
गीत प्रकार – नाट्यसंगीत