एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसि करूणा येईल तूझी ॥१॥
तें नाम सोपारें राम कृष्ण गोविंद ।
वाचेसीं सद्गद जपें आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा,
वायां आणिका पंथा जासी झणें ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं,
धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥
गीत – संत ज्ञानेश्वर
संगीत – केशवराव भोळे
स्वराविष्कार- ∙ यशवंत∙ प्रकाश घांग्रेकर∙ प्रसाद सावकार( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट – संत ज्ञानेश्वर
गीत प्रकार – चित्रगीत, संतवाणी
टीप – • स्वर- यशवंत, संगीत- केशवराव भोळे, चित्रपट- संत ज्ञानेश्वर.• स्वर- प्रकाश घांग्रेकर, संगीत- ???.• स्वर- प्रसाद सावकार, संगीत- ???.