जगाला नाही रे मंजूर राया आपुली

जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती !
राहिले लोचनी आसू, उरे ती याद ही ओठी !

कुणाला दु:ख सांगू मी?
कुणाला वेदना आता?
असे ते देत दुनिया ही, कुणी नाही मला त्राता !

कुणाला बोल लावावा?
कुणाशी न्याय मागावा?
कुणाचा दोष अन्‌ शिक्षा कुणाला? काय हे देवा !

गीत – मधुसूदन कालेलकर

संगीत – शंकरराव कुलकर्णी

स्वर- लता मंगेशकर, सुधीर फडके

चित्रपट – अखेर जमलं

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत