सखे बाई सांगते मी नवनवल गे गमत

सखे बाई सांगते मी नवनवल गे
गमते मना मृदुभावना हृदीची शतजन्‍मीची गे

स्वप्‍नात तयाशी प्रहर प्रहर बोलते
या मनोरथातुनी योजनभर विहरते
गमते मना सुखसाधना हृदीची शतजन्‍मीची गे

नीत प्रीत उमलतसे
माला मी गुंफितसे
भक्ति ज्योति तेवतसे
मन हसे-तन हसे-मधुरसे

गीत – योगिनी जोगळेकर

संगीत – पं. राम मराठे

स्वर- कीर्ती शिलेदार

नाटक – रंगात रंगला श्रीरंग

गीत प्रकार – नाट्यसंगीत