सखये, प्रेमपत्र पहिलें मखमाली

सखये, प्रेमपत्र पहिलें
मखमाली गालावरि लाजत
अधरांनी लिहिलें

अंगांगावरी रंग पसरला
मणिबंधीं फिरफिरुनी पुसला
उपाय माझा पुरता फसला
यौवन रसरसलें

वाचायातें नयनें मिटलीं
तरीही लाजरी हौस न फिटली
जाति न लिखितें पुसतां पुसलीं
अंतरंग कळलें