अंतरिच्या खुणा माझ्या

अंतरिच्या खुणा माझ्या । ओळखिसी एकला तूं ।
धुंडिती हे नेत्र कोणा । ओळखसी एकला तूं ।
थरथरती हे ओठ माझे । ओढते पाऊल मागें ।
भरुनि कां ये ऊर माझा । ओळखसी एकला तूं ॥
ऐकतां चाहूल तुझी । मूक होई वाणी माझी ।
परि बोले मी किती मुखांनीं । ओळखसी एकला तूं ॥

गीत – मो. ग. रांगणेकर

संगीत – डी. पी. कोरगावकर

स्वर- ज्योत्‍स्‍ना भोळे

नाटक – आशीर्वाद

गीत प्रकार – नाट्यसंगीत