अंतरीच्या गूढ गर्भीं एकदा जें वाटलें !
एकदा जें वाटलें तें प्रेम आता आटलें !
दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मीं, तू :
रंगलें आभाळ पूर्वी : तेंच आता फाटलें !
एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते स्नेहतंतू आंतले !
शेवटी मंदावलेल्या वादळी वार्याप्रमाणे
राहणें झालें दिवाणें, गीत गाणें कोठलें !
गीत – ना. घ. देशपांडे
संगीत – राम फाटक
स्वराविष्कार- ∙ सुधीर फडके∙ जी. एन्. जोशी( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार – भावगीत, कविता
टीप – • काव्य रचना- १९३४.• स्वर- सुधीर फडके, संगीत- राम फाटक.• स्वर- जी. एन्. जोशी, संगीत- जी. एन्. जोशी.