तव भास अंतरा झाला मन रमता मोहन

तव भास अंतरा झाला मन रमता मोहना

हासती फुले भवताली
मधुर ये फळावर लाली
स्मितसाम्य तुझ्या अधरीचे मम खिळवी लोचना

वाहत ये झुळझुळ वारा
दरवळला परिमळ सारा
तव हृदयपुष्पगंधाची अनुभविते कल्पना

गीत – कवी गिरीश

संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी

स्वर- आशालता वाबगावकर

नाटक – मत्स्यगंधा

राग – मिश्र मांड

गीत प्रकार – नाट्यसंगीत, हे श्यामसुंदर