पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥
तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥
याती शुद्ध नाहीं भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥
मुखीं नाम नाहीं । कान्होपात्रा शरण पायीं ॥४॥
गीत – संत कान्होपात्रा
संगीत – मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वराविष्कार- ∙ मधुवंती दांडेकर∙ बालगंधर्व( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग – झिंझोटी
ताल-केरवा
गीत प्रकार – नाट्यसंगीत, संतवाणी, विठ्ठल विठ्ठल