भान हरी हा । मोहि नयना मना ॥
जिंकोनि अबला, तनु रोमरोमी ।
सत्ताबलानें, विहार करी हा ॥
नयनांत खेळे श्रवणांत बोले ।
हृदयात डोले प्राणसखा हा ॥
गीत – वीर वामनराव जोशी
संगीत – वझेबुवा
स्वर- बापू पेंढारकर
नाटक – राक्षसी महत्वाकांक्षा
राग – मांड
ताल-दादरा
चाल-छा गयो तेरे नयनो में राम
गीत प्रकार – नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी