ओंजळीत माझ्या माझे उसासे
आणि भोवताली आभाळ भासे !
कंठात हुंकार परतून गेले
तळव्यात अश्रू किती वेचलेले
कसे मीच माझे अवसान होते
स्वप्नास माझ्या, माझे दिलासे
आणि भोवताली आभाळ भासे !
दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा
जगणेच आहे इथे साचलेले
किती प्रश्न भवती आणि मन रिकामे
कशाचे करावे स्वत:शी खुलासे
आणि भोवताली आभाळ भासे !
गीत – गजेंद्र अहिरे
संगीत – भास्कर चंदावरकर
स्वर- साधना सरगम
चित्रपट – सरीवर सरी
गीत प्रकार – चित्रगीत