शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या

शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी

काय बोलले नकळे
तू समजुन घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी

दुःख नको तुटताना
अश्रु नको वळताना
मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी

साक्ष लाख तार्‍यांची
स्तब्ध अचल वार्‍याची
ज्योत बनुन जळले रे मी तुझ्या पथावरी

गीत – मंगेश पाडगांवकर

संगीत – विश्वनाथ मोरे

स्वर- सुमन कल्याणपूर

राग – पूरिया धनाश्री, पूरिया, मारवा

गीत प्रकार – भावगीत