गडद जांभळं
भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
सांजेच्या मलूल
धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
गीत – ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर- उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अरुण इंगळे
चित्रपट – एक होता विदूषक
गीत प्रकार – चित्रगीत, ऋतू बरवा