ऋतुराज आज वनि आला,

ऋतुराज आज वनि आला, ऋतुराज आज वनि आला !
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेउनी आला !

कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला !
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला !
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला !

गीत – विद्याधर गोखले

संगीत – पं. राम मराठे, प्रभाकर भालेकर

स्वर- मधुवंती दांडेकर

नाटक – मदनाची मंजिरी

गीत प्रकार – नाट्यसंगीत