पुनव पुसाची आली आता
साल सोळावं सरायचं
कुठवर चोरून फिरायचं,
औंदा लगीन करायचं
आई कोण? बाबा कोण?
साक्षीदार पाहिजेत तीन
रस्त्यावरचं धरायचं
सरकारात जाऊन, नावगाव लिहून
पाच रुपये तिथं भरायचं
साल सोळावं सरायचं
न्हाई मांडव, नको वर्हाड
पहिल्या रातीत नवं बिर्हाड
एकमेकांमधी मुरायचं
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – राम कदम
स्वर- आशा भोसले
चित्रपट – वर्हाडी आणि वाजंत्री
गीत प्रकार – लावणी, चित्रगीत