बघा ना छळतो हा, छळतो हा वारा

बघा ना छळतो हा, छळतो हा वारा असा?
ओढुनी अंचल हा, अंचल हा पळतो असा !

आळ वृथा का या वार्‍यावर, वार्‍याहुन मन चंचल, आवर !
कशी आवरु हलता झुलता तव नयनांचा आरसा !

इथेच झाले नील जलावर, स्वर्ग-धरेचे मीलन सुंदर
प्रतिबिंबाला बिंब पाहता वेडावुनी मज राजसा !

भावमधूर ही फुले मनोहर, बहरून आली पर्णपाचूवर
सहवासाचा सुगंध अपुला परिमळ तो हा गोडसा !

गीत – पी. सावळाराम

संगीत – वसंत प्रभु

स्वर- आशा भोसले, दशरथ पुजारी

चित्रपट – बायकोचा भाऊ

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत