घनश्याम नयनी आला
सखे, मी काजळ घालू कशाला?
रोमांचांनी नटली काया
हिरे-माणके कशास वाया?
कशास मोहनमाला?
कटीभोवती कर कृष्णाचे
लेणे ल्याले आभासाचे
कशास मग मेखला?
कृष्णसख्याची मादक मुरली
रात्रंदिन या कानी भरली
शृंगार सर्व झाला !
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर- सरस्वतीबाई राणे
गीत प्रकार – हे श्यामसुंदर, भावगीत, नयनांच्या कोंदणी