वद जाउं कुणाला शरण करी जो हरण संकटाचें ।
मी धरिन चरण त्याचे । अग सखये ॥
बहु आप्त बंधु बांधवां प्रार्थिलें कथुनि दुःख मनिंचें ।
तें विफल होय साचें । अग सखये ॥
मम तात जननि मात्र तीं बघुनि कष्टती हाल ईचे ।
न चालेचि कांहिं त्यांचें । अग सखये ॥
जे कर जोडुनि मजपुढें नाचले थवे यादवांचे ।
प्रतिकूल होति साचे । अग सखये ॥
गीत – अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत – अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- ∙ बालगंधर्व∙ सवाई गंधर्व∙ मधुवंती दांडेकर( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक – संगीत सौभद्र
राग – जोगिया
चाल-जो चिदानंदकंद
गीत प्रकार – नाट्यसंगीत