थकले रे डोळे माझे वाट तुझी पाह

थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता

सुकला रे कंठ माझा
तुज आळविता
तुज आळविता रे
नाम तुझे जपता

आटले रे अश्रु माझे
वाहता वाहता
वाहता वाहता रे
आठवणी काढता

शिणला रे जीव माझा
तुजविण राहता
तुजविण राहता रे
तुज नच भेटता

गीत – कवी अनिल

संगीत – यशवंत देव

स्वराविष्कार- ∙ उषा मंगेशकर∙ ज्योत्‍स्‍ना भोळे( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

गीत प्रकार – भावगीत, नयनांच्या कोंदणी

  टीप – • स्वर- उषा मंगेशकर, संगीत- यशवंत देव.• स्वर- ज्योत्‍स्‍ना भोळे, संगीत- केशवराव भोळे.

  .