थांब रे घना,
जा निरोप घेउनी, सांग मोहना
कुंज कुंज हा उदास
जागेपणी होत भास
तूच एक जाणिसी माझिया मना
एकटीच झुरत उभी
तारका न एक नभी
एकटीच सोशिते सर्व यातना
सांग जाउनी तयास
वैरी माझेच श्वास
फूलही मला इथे होय वेदना
गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – विश्वनाथ मोरे
स्वराविष्कार- ∙ उषा मंगेशकर∙ साधना सरगम( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार – हे श्यामसुंदर, भावगीत
टीप – • स्वर- उषा मंगेशकर, संगीत- विश्वनाथ मोरे.• स्वर- साधना सरगम, संगीत- मंदार आपटे.