धनराशी जाता मूढापाशी

धनराशी जाता मूढापाशी, सुखवी तुला, दुखवी मला ।

शस्त्र जसे अबलाकराला, रूप जसे ते जोगिणीला
सत्ता सुखरत अधमाला, धन जडजना, मदत पतना ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वराविष्कार- ∙ माणिक वर्मा∙ बालगंधर्व∙ मधुवंती दांडेकर( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत मानापमान

ताल-धुमाळी

चाल-परदेसी सैया

गीत प्रकार – नाट्यसंगीत