तारिणी नववसनधारिणी । वात्सल्य

तारिणी नववसनधारिणी ।
वात्सल्य हृदयी धरुनी ।
करिसी दया स्वजनी ॥

तळमळे अवघी प्रजा ।
उत्सवी मग्‍न राजा ।
साधितो शकुनी काजा ।
वैरी घर भरिती, स्वैरगती रमती ।
प्रजाजन फिरती रानी ॥

गीत – गोविंदराव टेंबे

संगीत – गोविंदराव टेंबे

स्वराविष्कार- ∙ मधुवंती दांडेकर∙ माणिक वर्मा( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत पट-वर्धन

राग – तिलंग

गीत प्रकार – नाट्यसंगीत