अंगणी पारिजात फुलला
बहर तयाला काय माझिया प्रीतिचा आला
धुंद मधुर हा गंध पसरला
गमलें मजला मुकुंद हंसला
सहवासातुर मदीय मनाचा कणकण मोहरला !
गीत – विद्याधर गोखले
संगीत – छोटा गंधर्व
स्वर- जयमाला शिलेदार
नाटक – सुवर्णतुला
राग – बिहाग
गीत प्रकार – नाट्यसंगीत