जनी जनार्दन म्होरं बसला रोखून

जनी जनार्दन म्होरं बसला रोखून आपुल्या नजरा
गणराजाला करू मुजरा

आधीमधी शंकर मधोमध बसला
नटनागर नट खुदुखुदु हसला
ताल-सुरांनी आज गोविला कवनफुलांचा गजरा
गणराजाला करू मुजरा

गीत – मा. दा. देवकाते

संगीत – राम कदम

स्वर- छोटा गंधर्व

चित्रपट – पुढारी

गीत प्रकार – चित्रगीत, प्रथम तुला वंदितो, नयनांच्या कोंदणी