पतितपावन नाम ऐकुनी आलो मी

पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा

घेशी जेव्हा देशी ऐसा असशी उदार
काय देवा रोधु तुमचे कृपणाचे द्वार
सोडी ब्रिद देवा आता न होसी अभिमानी
पतितपावन नाम तुजला ठेवियले कोणी?

हाती घेउनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी
पतितपावन नव्हेसी हरी तू अति मोठा घातकी
नामा ह्मणे देवा तुझे न लगे मज काही
प्रेम असु द्या हृदयी तुमचे, आठवण पायी

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – सुधीर फडके

स्वर- प्रसाद सावकार

चित्रपट – संत गोरा कुंभार

गीत प्रकार – संतवाणी, चित्रगीत