रतिहुन सुंदर मदनमंजिरी !

रतिहुन सुंदर मदनमंजिरी ! मदनाचें वरदान तुला

ललित कोमला तव सुंदरता लाजविते मंदार-फुलां
बघुनि तुला गगनांत खंगते कलेकलेनें चंद्रकला
कळे न मजला, वृथा फुलांचा नाद कशाला हवा तुला?

गीत – विद्याधर गोखले

संगीत – छोटा गंधर्व

स्वर- प्रसाद सावकार

नाटक – सुवर्णतुला

गीत प्रकार – नाट्यसंगीत