सखी मी दर्ददिवाणी

सखी मी दर्ददिवाणी, माझी व्यथा कुणा न कळे ग !
घायाळाची मर्मवेदना घायाळास कळे ग !

रत्‍नपारख्याविण रत्‍नांची कुणा न पारख व्हावी
शूलावर मम शेज सखे जर नीज कशी मज यावी
गगनमंडळी शेज प्रियाची, मीलन मग कोठे ग !

फिरते वणवण जखमी होवून, वैद्य कुणी न भेटे ग
मीरेची संपेल व्यथा जर हरीच वैद्य मिळे ग !

गीत – मंगेश पाडगांवकर

संगीत – यशवंत देव

स्वर- शोभा जोशी

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, भावगीत