घननीळा लडिवाळा झुलवु नको

घननीळा लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा !

सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा !

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – सुधीर फडके

स्वराविष्कार- ∙ माणिक वर्मा∙ सुधीर फडके( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

चित्रपट – उमज पडेल तर

राग – पहाडी

गीत प्रकार – चित्रगीत, हे श्यामसुंदर, शब्दशारदेचे चांदणे

  टीप – • स्वर- माणिक वर्मा, चित्रपट- उमज पडेल तर.