बलसागर तुम्हि वीरशिरोमणि कोठें

बलसागर तुम्हि वीरशिरोमणि कोठें तरि रमलां ।
आश्वासन जिस दिलें तिला कां विसरुनियां गेलां ॥

पेरियलें जें प्रीतितरूचें बीज हृदयिं त्याला ।
अंकुर येउनि सुदृढ तयाचा वृक्ष असे झाला ॥

सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां ।
चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥

पांडुकुमारा पार्थ नरवरा, राखा वचनाला ।
निश्चय माझा नढळे जरि हा कंठ कुणीं चिरला ॥

गीत – अण्णासाहेब किर्लोस्कर

संगीत – अण्णासाहेब किर्लोस्कर

स्वराविष्कार- ∙ माणिक वर्मा∙ नीलाक्षी जोशी∙ आशा खाडिलकर( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत सौभद्र

राग – पिलू

ताल-धुमाळी

गीत प्रकार – नाट्यसंगीत