धाव-पाव सावळे विठाई का मनी धरि

धाव-पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी
अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी

एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी
कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसे घडी

जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी
गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिते उडी

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – वसंत देसाई

स्वर- आशा भोसले

चित्रपट – छोटा जवान

गीत प्रकार – चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल